बंगळुरूचा पुणेवर १३ धावांनी विजय

0
76

कर्णधार विराट कोहली आणि अब्राहम डीविलियर्स यांनी धडाकेबाज अर्धतकांसह दुसर्‍या विकेटसाठी केलेल्या १५५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रायझिंग पुणे सुपरजायंट्‌सवर १३ धावांनी विजय मिळविला. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या दोन कर्णधार झालेल्या या झुंजीत विराट वरचढ ठरला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मिळालेल्या १८६ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना रायझिंग पुणे सुपरजायंट्‌सला ८ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली. अजिंक्य रहाणे (८ चौकारांच्या साहाय्याने ४६ चेंडूत ६०), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (४१), थिसारा परेरा (३४) आणि रजत भाटिया (२१) यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांना १४ धावा कमी पडल्या. बंगळुरूतर्फे केन रिचर्डसनने १३ धावांत ३ बळी मिळविले. त्याला चांगली साथ देताना शेन वॉटसनने २ तर हर्षल पटेल व तबरैझ शामसीने प्रत्येकी १ बळी मिळविला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करतना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ गडी गमावत १८५ अशी धावसंख्या उभारली. थिसारा परेराने लोकेश राहुलला (७) ईशांत शर्माकरवी झेलबाद करीत पुणेला प्रारंभची यश मिळवून दिले. परंतु त्यानंतर सध्या जबरदस्त बहरात असलेल्या कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करीत अब्राहम डीविलियर्सच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी १५५ धावांची दीडशतकी भागिदारी केली. थिसारा परेरानेच दोघांनाही बाद केले. कोहली ७ चौकार व २ षट्‌कारांच्या साहाय्याने ६३ चेंडूत ८० धावांची कर्णधारी अर्धशतकी खेळी करून अजिंक्य रहाणेकडे झेल देऊन परतला. तर डी’विलियर्सने अंकित शर्माकडे झेल देऊन बाद होण्यापूर्वी ६ चौकार व ४ षट्‌कारांच्या साहाय्याने ४६ चेंडूत ८३ धावांची विस्फोटक खेळी केली.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः विराट कोहली झेल अजिंक्य रहाणे गो. थिसारा परेरा ८०, लोकेश राहुल झेल ईशांत शर्मा गो. थिसारा परेरा ७, अब्राहम डी’विलियर्स झेल Aअंकित शर्मा गो. थिसारा परेरा ८३, शेन वॉटसन नाबाद १, सर्फराज खान नाबाद २. अवांतर ः १२. एकूण २० षट्‌कांत ३ बाद १८५ धावा. गोलंदाजी ः ईशांत शर्मा ४/०/४७/०, थिसारा परेरा ४/०/३४/३, अंकित शर्मा ४/०/३१/०, रजत भाटिया ३/०/२२/०, रविचंद्र अश्विन ३/०/२२/०, मुरुगन अश्विन २/०/२९/०.
रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स ः अजिंक्य रहाणे यष्टीचीत लोकेश राहुल गो. तबरेझ शामसी ६०, फाफ डु प्लेसिस झेल हर्षल पटेल गो. केन रिचर्डसन २, केविन पिटरसन रिटायर्ड हर्ट ०, स्टिव्ह स्मिथ धावचीत विराट कोहली ४, महेंद्रसिंह धोनी झेल अब्राहम डी’विलियर्स गो. हर्षल पटेल ४१, थिसारा परेरा झेल मनदीप सिंग गो. शेन वॉटसन ३४, रजत भाटिया झेल शेन वॉटसन गो. केन रिचर्डसन २१, रविचंद्र अश्विन झेल हर्षल पटेल गो. शेन वॉटसन ०, अंकित शर्मा नाबाद ३, मुरुगन अश्विन झेल अब्राहम डी’विलियर्स गो. केन रिचर्डसन ०, ईशांत शर्मा नाबाद ०. अवांतर ः ७. एकूण २० षट्‌कांत ८ बाद १७२ धावा. गोलंदाजी ः स्टुअर्ट बिन्नी २/०/२३/०, केन रिचर्डसन ३/०/१३/३, हर्षल पटेल ४/०/४६/१, शेन वॉटसन ४/०/३१/२, तबरैझ शामसी ४/०/३६/१, इक्बाल अब्दुल्ला ३/०/२२/०.