बँक कर्मचाऱ्यांचा आजपासूनचा दोन दिवसांचा देशव्यापी संप मागे

0
2

बँक कर्मचाऱ्यांनी आज सोमवार दि. 24 व उद्या मंगळवार दि. 25 असे दोन दिवस संप जाहीर केलेला संप काल रविवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचारी 24 आणि 25 मार्च असे दोन दिवस देशव्यापी संपवार जाणार होते. मात्र, अर्थ मंत्रालय आणि आयबीएकडून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर बँक कर्मचारी संघटनांनी त्यांचा दोन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित केला आहे. त्यामुळे आज सोमवारपासून देशभरातील बँका सुरू राहणार आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, नऊ बँक कर्मचारी संघटनांची एकत्रित संस्था यांनी आज व उद्या 24-25 मार्च रोजी संपाची हाक दिली होती. बँक कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कामकाजाचा आठवडा पाच दिवसांवर आणावा आणि सर्व कर्मचारी संवर्गात पुरेशी भरती करावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

अर्थमंत्रालयाशी चर्चा
प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्य कामगार आयुक्तांसमोर घेण्यात आला. ज्यांनी सर्व संघटनांना सामंजस्य बैठकीसाठी बोलावले होते. इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि अर्थ मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा आणि लिंक्ड इन्सेंटिव्हजवरील वित्तीय सेवा विभागच्या अलीकडील सूचना त्वरित मागे घेण्याची मागणी देखील केली होती. या सूचनेमुळे नोकरीची सुरक्षितता धोक्यात आली असून, कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.
यावेळी झालेल्या बैठकीत, संबंधित सर्व कर्मचारी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या होत्या. ज्यात सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांचा कामाचा आठवडा समाविष्ट आहे.