फोंडा, (प्रतिनिधी) : कोरोनाची धास्ती लोकांनी घेतली असून सरकारने आवाहन केल्यानुसार लोक घरीच बसल्याने जीवनावश्यक वस्तू मिळवणे मुश्किलीचे ठरले आहे. त्यात महत्त्वाच्या दुधाचा समावेश असून आता गोवा डेअरीनेच दुधाचा पुरवठा राज्यभर सुरळीत आणि सुविहित करण्यासाठी पुढाकार घेतला असून गोवा डेअरीची दूध पाकिटे घरपोच वितरणासाठी योजना आखली आहे.
या योजनेनुसार राज्यातील विविध ठिकाणाहून एकूण ३४ दूध केंद्रांच्या वितरकांकडून हे दूध ग्राहकांच्या मागणीनुसार पोचवले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक पाकिटामागे नेहमीच्या दराशिवाय किमान २ रुपये दूध ग्राहकाला जादा मोजावे लागणार आहेत.
दुधाप्रमाणेच, दूध उत्पादकांना पशुखाद्य मिळण्यासाठीही गोवा डेअरीने योजना आखली आहे. त्यासाठी गोवा डेअरीच्या वाहनातून संबंधित दूध सोसायट्यांकडे आणून दिले जाईल. दूध उत्पादकांनी आपली मागणी संबंधित दूध सोसायट्यांकडे नोंदवावी, त्यानुसार पुरवठा केला जाईल, असेही गोवा डेअरी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
राज्यात अत्यावश्यक दूध सेवा सुरळीत ठेवून ग्राहकांसाठी विविध ठिकाणी खालीलप्रमाणे दूध वितरकांची नावे व क्रमांक दिले आहेत.
मोरजी – अजय पेडणेकर (८००७५४०३६७), म्हापसा – प्रितेश केरकर (७०८३७३९५२०), संदेश नाईक (९१५८५४०२००), प्रकाश वायंगणकर (९४२३३१५८६०), हळदोणे – दामोदर प्रभू (८००७५९५९९७), मडगाव – दीपा वाडेकर (८४१२९४०४८०), घोगळ – शाम जाधव (७०२०१५७१४९), पावर हाऊस – संजय लोटलीकर (९९२३८७८४०६), ओल्ड स्टेशन – वासुदेव सोनाळ (८६००४१८१२०), मडगाव – विश्वनाथ मोरे (९८२३१२१३१६), मडगाव – सुनील पवार (९०४९१६८०६१), आके – रंजना जाधव (७०६६०९८४०५), घोगळ – उमेश साळुंके (९९६०३१८१४३), पणजी – विराज पै (९८२३२९००७७), उदय प्रभू (९८८१५११५०३), मिरामार दोनापावल – नागराज पाटील (८९९९७५९८४७), फोंडा – प्रशांत गावकर (९८२३७१४४७६), अब्बास शेख (९४०३५२६०४३), सांगे – शिवाजी बोरकर (९५४५४१३९३९), वास्को – प्रशांत शेट्टी (९४५९८८४४२३), वेर्णा – रतन प्रसाद (९४२००१८८६८), नागवा – बासिलो गोन्साल्विस (९८८१३४५००८), सावर्डे – अनिल सिमेपुरुषकर (९१४५२९२६८९), प्रभाकर आदेल (८४११०२५०६२), नेत्रावळी – रमेश गावकर (९४०५५२३८४०), फातोर्डा – रशिद अब्दुल – (९७६४९२३९२२), उत्तम रायकर (७२१८१८७२३४), पर्वरी – वामन नाईक (९९२२४१७०९०), विनोद शर्मा (७५०७९७९५९४), सुकूर – सुहासिनी नाईक (८४०८०८४१८४), वाळपई – तेजस काणेकर (९४२१७५२२२९), तिस्क उसगाव – प्रकाश मोरे (८९९९६०१६०६), डिचोली – अकबर शेख (९६२३४९७४४८), विद्या विजय नाटेकर (९६०४२४७८२९).
राज्यात कोरोनाच्या धोक्यामुळे कर्फ्यू लागू केल्याने गोवा डेअरीने दूध ग्राहकांना घरपोच पोचावे यासाठी दूध वितरणाची सोय केली आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार जवळच्या वितरकाकडे मागणी करावी. दूध संबंधित इमारत किंवा गेटवर आणून दिले जाईल, ग्राहकांनी योग्य रक्कम दूध पोचवणाऱ्याला द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात महत्त्वाचा घटक असलेले दूध वितरण व्यवस्थित व्हावे यासाठी गोवा डेअरीचे दूध घरपोच देण्यासाठी गोवा डेअरीने अत्यावश्यक सेवा सुरू केली आहे. गैरसोय टाळण्यासाठी आणि या सेवेचा लाभ घेण्यासाठी दूध ग्राहकांनी योग्य सहकार्य करावे. राज्यातील अन्य दूध वितरकांकडेही संपर्क साधण्यात आला असून दूध वितरकांची संख्या यापुढेही वाढण्याची शक्यता आहे, असे गोवा डेअरीचे प्रशासक अरविंद खुटकर यांनी सांगितले.