फोंड्यात अग्निशमन जवानही पॉझिटिव्ह

0
170

फोंडा पोलिसांबरोबरच आता अग्निशमन दलाचेही जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. कुंडई येथील अग्निशमन दलाचा एक जवान जो कुर्टी येथील रहिवासी आहे, तो पॉझिटिव्ह आहे. याशिवाय पणजी मुख्यालयातही पॉझिटिव्ह सापडू लागल्याने इतरांनी आपापली चाचणी करवून घेण्यास प्राधान्य दिले असून फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड निगा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, वाडी – तळावली येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात आयडी इस्पितळात फोंड्याबरोबरच इतर ठिकाणचे वीस पेक्षा जास्त अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

फोंडा पोलीस स्थानक कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्यानंतर आता अग्निशमनदलातील जवानांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. कुंडईसह मुख्यालयातील दलाचे इतर जवान पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे चाचणीवर आता अधिक भर देण्यात आला आहे.