फोंड्याच्या बाजारकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

0
92

सोपोकरप्रश्‍नी निवेदन सादर
फोंडा येथील बाजारकरांनी काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर मोर्चा नेऊन सोपो करात केलेली वाढ रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. बर्‍याच दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे. पालिकेने सोपोकर ५ रुपयांवरून २० रुपये करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारकर पालिकेच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनी बाजारकरांना सक्रिय पाठिंबा दिला आहे.
मुंडकार दुरुस्ती कायद्यास संमती
राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी विधानसभेत संमत केलेल्या गोवा मुंडकार संरक्षण दुरुस्ती कायद्यास मान्यता दिली.