गोविंद गावडे यांची मागणी
फोंडा मतदारसंघात होऊ घातलेल्या गोवा विधानसभेसाठीच्या मध्यावधी निवडणुकीत या मतदारसंघाचे दिवंगत आमदार व मंत्री रवी नाईक यांच्या दोघा पुत्रांपैकी एकाला भाजपने उमेदवारी द्यावी, असे मत काल प्रियोळचे आमदार व माजी मंत्री गोविंद गावडे यांनी मांडले. पक्षाने रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक व रॉय नाईक यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी अशी आपली सूचना असल्याचे गावडे म्हणाले. उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय पक्षाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रवी नाईक यांनी राजकीय नेता म्हणून दिलेले योगदान हे फार मोठे असून त्यांनी फोंडा मतदारसंघात आपला असा एक वेगळा ठसा उमटविला असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. फोंडा मतदारसंघातील असंख्य मतदार हे रवी नाईक यांच्या कुटुंबाशी जोडले गेलेले असल्याने पक्षाने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी देण्याची गरज असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. आता यासंबंधीचा काय तो निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपला घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.