फुटिर आमदारांविरोधात आज न्यायालयात सुनावणी

0
26

कॉंग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपत्रता याचिकेवर आज ११ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने चोडणकर यांची याचिका फेटाळून लावताना कॉंग्रेस व मगोच्या आमदारांना पात्र ठरवणारा गोवा विधानसभा सभापतीचा निवाडा उचलून धरला होता. त्या निवाड्याला चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. कॉंग्रेस व मगो पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १२ आमदारांविरूद्ध दोन्ही पक्षांतर्फे दोन वेगवेगळ्या अपात्रता याचिका तात्कालीन सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर सादर करण्यात आल्या होत्या. पैकी कॉंग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व मगोतर्फे सुदिन ढवळीकर यांनी या याचिका सादर केल्या होत्या.