फुटबॉलच्या विकासासाठी क्लबनी   सरकारशी हातमिळवणी करावी

0
92

>> धेंपो स्पो. क्लबच्या सोहळ्यात पर्रीकरांचे आवाहन  

फुटबॉल खेळ विरंगुळ्यासाठी आणि करमणुकीसाठी खेळणे व त्यात नैपुण्य मिळविण्यासाठी खेळणे यात रक आहे. प्रतिभावान खेळाडू पुढे यावेत व फुटबॉलचा गोव्यात विकास व्हावा यासाठी राज्यातील फुटबॉल क्लबनी गोवा सरकारशी हात मिळवणी (टायअप) करण्याची गरज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी ताळगाव येथे प्रतिपादिली.
धेंपो स्पोटर्‌‌स क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ताळगाव कम्युनिटी सभागृहात आयोजित केलेल्या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री पर्रीकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून अ. भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल व धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, २०१२ साली फुटबॉल हा गोव्याचा ङ्गराज्य खेळफ म्हणून मी घोषित केल्यापासून फुटबॉल मैदानाचा वापर अधिक होऊ लागला. फुटबॉल क्लब चालविणे हे तसे महागडे आहे. मात्र धेंपो क्लबने हे कार्य सातत्याने करून दाखविले आहे व लौकिक मिळविला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी, धेंपोला ङ्गक्लबफ म्हणून नव्हे तर एक संस्था म्हणून संबोधले पाहिजे असे सांगून ५० वर्षे धेंपोने फुटबॉलसाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. अ. भा. फुटबॉल महासंघ चालविणे हे विविध पक्षांनी एकत्र करून सरकार चालविण्यापेक्षा कठीण आहे, असे पर्रीकरांना उद्देशून पटेल यांनी सांगून सभागृहात हास्याची लकेर पेरली. ते म्हणाले की, गोव्यात व कोलकाता येथे ङ्गुटबॉलबद्दल नितांत प्रेम, बांधिलकी आणि उत्साह आहे. फुटबॉल खेळात आता आमुलाग्र बदल होत असून, फुटबॉल भारतात अधिक व्यावसायिक बनला पाहिजे त्यासाठी अधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. फुटबॉलमध्ये भारताला जगात पहिल्या पन्नास क्रमांकात स्थान मिळविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी व्यावसायिक फुटबॉलपटू तयार व्हायला हवेत.
गेल्या पन्नास वर्षांत फुटबॉलसाठी योगदान दिलेल्या पन्नास फुटबॉलपटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच मार्कुस यांनी लिहिलेल्या ङ्गगोल्डन इगलफ या धेंपो स्पोटर्‌‌स क्लबच्या वाटचालीचा आलेख असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
२२४ फुटबॉल मैदानांचे मॅपिंग करण्यात आलेले गोवा हे एकमेव राज्य असल्याचे नमूद करून पटेल यांनी ६ ते २० ऑक्टोबर दरम्यान गोव्यात १७ वर्षांखालील खेळाडूंची गोव्यात वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यामुळे गोव्यात फुटबॉलचा स्तर वाढीस लागण्यास मदत होईल असे सांगितले.
या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे सपत्नीक उपस्थित होते. तसेच फ्रान्सिस सार्दिन, मंत्री फ्रान्सिस डिसोझा, आमदार रवी नाईक (माजी मुख्यमंत्री), मंत्री बाबू आजगावकर, जयेश साळगावकर, विजय सरदेसाई, मॉविन गुदिन्हो, मडकईकर, रोहन खंवटे हे आजी माजी मंत्री तसेच पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो, आमदार प्रवीण झांटये, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, निलाताई धेंपो आदी मान्यवर उपस्थित होते.
पल्लवी धेंपो यांनी श्री. पर्रीकर व श्री. पटेल यांचा सन्मान केला.  फ्रान्सिस