प्रेम म्हणजे प्रेम असतं…!

0
238

– अंतरा भिडे

तरुण वयात कुणावर प्रेम करणं, आपल्याला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असणं ही गोष्ट हल्ली सगळेच सहजपणे मान्य करून घेतात. पालकांचा, वडिलधार्‍यांचाही दृष्टिकोन बदलताना दिसतो. आणि तरुण वयातील प्रेमाला स्वीकारताना दिसतो. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण खूप तरुणांवर अशीही परिस्थिती येते की आई-वडिल, समाज, त्यांचं प्रेम स्वीकारत नाहीत. एवढंच नव्हे तर कायदासुद्धा त्यांच्या प्रेमाच्या आड येतो. त्यांना मान्यता देत नाही. त्यांना बरोबर राहण्याचं, लग्न करण्याचं पर्मिशन् कायद्यानं मिळत नाही. मी समलिंगी नात्यांविषयी बोलतेय हे तुम्हाला कळलंच असेल. तीच नाती, ज्यांना ३७७ कलमाखाली कायद्यानं हल्लीच गुन्हा म्हणून घोषित केलंय, क्रिमिनलायझ केलंय.

माहितीसाठी सांगते, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर अशा चार प्रकारचे लैंगिक स्वभाव असलेली माणसं समलिंगी म्हणून ओळखली जातात. समलिंगी पुरुषांना गे, तर बायकांना लेस्बियन म्हणतात. बायसेक्शुअल असणं म्हणजे प्रकृतीनंच दोन्ही लिंगाकडे आकर्षिक होण्याची प्रवृत्ती असणं. ट्रान्सजेंडरिसमचे खूप पैलू आहेत. ज्यातला मुख्य पैलू म्हणजे स्वत:च्या शरीराला कम्फर्टेबल न वाटल्याने वेगळ्या प्रकारचा वेष करणं, ज्याला आपण क्रॉसड्रेसिंग म्हणतो, आणि हळूहळू लिंगबदलाकडे जाणं, ट्रान्सिशन करणं. कायद्यानं हल्लीच ज्यांना तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली आहे ते ट्रान्सजेंडर प्रकारात मोडतात. ह्या सगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वांमध्ये समलिंगीयत्वाचे गुण आढळतात, आणि आपण त्या सगळ्यांना मिळून ‘एलजीबीटी’ असं नाव दिलं आहे.
कायद्यानं मान्यता न मिळणंही समाजमान्यता नसल्यामुळे झालेलं आहे. समलिंगी नात्यांना समाज का मान्यता देत नाही ह्याची लोकांनी दिलेली काही कारणं म्हणजे समलिंगीयत्व. चुकीचं कारण त्यापासून जनन होत नाही. म्हणजेच, मुलं होत नाहीत. समलिंगीयत्व धर्म नाकारतो, वा देव नाकारतो. ते नैसर्गिक नसून तो एक दोष वा विकृती आहे. ढहश शिु र्षेीीा ेप ीशश्रळसळेप रपव र्िीलश्रळल श्रळषश ह्या फोरमनं हल्लीच एक पोल घेतला आणि त्यांनी सांगितलं की समलिंगीयांना विरोध अधिक वेळा धार्मिक प्रवृत्तीच्या माणसांचा असतो. समाज जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत समलिंगीयांना सुखानं जगणं अशक्य.
समलिंगीयत्व – विरोधी तत्वांवर काही प्रश्‍न करता येतात. ते म्हणजे – चिपांझी, डॉल्फिन, एप आणि कुत्री-मांजरं धरून एक हजार पाचशेहून अधिक प्रकारच्या प्राण्यांमधे समलिंगीयत्व आढळतं तर माणसांमधलंच अनैसर्गिक कसं? दुसरं म्हणजे संभोगाचा मूळ आणि मुख्य उद्देश प्रजननक्रिया ठरवली, तर हस्तमैथुन आणि मुखमैथुनासारख्या संभोगक्रिया, ज्यांचा समावेश आणि समर्थन कामसूत्रातही आहे, त्याही अनैसर्गिक?
कंडोम आणि बाकीच्या कौंट्रासेप्टिव्हजचा उपयोग करणं बंद करून टाकावा प्रजनन होत नाही म्हणून?
तुम्हांला माहितिये? एक जीनियस गणितशास्त्रज्ञ – ऍलन ट्युरिंग, ज्यानं जगातला पहिला संगणक तयार केला, त्यानं समलिंगी प्रवृत्ती दाखवली म्हणून नपुंसक केलं गेलं, ज्यामुळे त्याला खूप सायड इफेक्ट्‌स सहन करावे लागले आणि त्यानेे बेचाळिसाव्या वर्षी आत्महत्या केली. किती दु:खाची गोष्ट आहे ना? धर्मात असं सांगितलं असेल की समलिंगीयत्व पाप आहे; पण धर्मानं असंही सांगितलंय ना की जो चुकतो त्यालाही स्वीकारावं म्हणून. त्याला मारायला, त्रास द्यायला, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायला धर्म सांगत नाही ना?
जर कुणालाही असं वाटत असेल की देव त्यांना शिक्षा करेल, तर त्यांनी ते देवावरच सोडावं, स्वत: दुसर्‍याला शिक्षा करायला जाऊ नये. बरोबर?
आम्हांला वेगळेपणाची नेहमी भीती असते. पण भीती आहे म्हणून ती गोष्ट खोटी, अनैसर्गिक, अस्वाभाविक, पापकृत्य ठरवणं किती बरोबर?
आमचे जीन्स, प्रीनेटल होर्मोन्स आणि ब्रेन स्ट्रक्चर आमची सेक्सशुआलिटी म्हणजेच लैंगिकता ठरवतात. म्हणजेच, वैज्ञानिक नजरेने बघितल्यास समलिंगीयत्व दोष नसून ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. एका सर्वेप्रमाणे जगातल्या ६० % स्त्रिया आणि ३५ % पुरुष बायसेक्सुअल असतात.
सामाजिक दबावामुळे समलिंगी जोडप्यांना इतरांहून अधिक त्रास सहन करावे लागतात. मुख्यपणे स्पर्म डोनेशन मिळवायच्या वेळेस वा मूल दत्तक घेतेवेळी जे त्रास होतात ते असह्यच. खूप कमी लोक त्यांना इतरांप्रमाणे वागणूक देतात. अधिक लोकांकडून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रास सहन करावे लागतात. नाती ही नाती असतात, प्रेम हे प्रेम असतं. पुरुष आणि स्त्री यांमध्ये जसं प्रेम असतं, तसंच ते दोन समलिंगीयांमधे असतं. त्यांनाही मुलं हवी असतात. समजून घेणं एवढंही कठीण नाहीये.
खूप लोक म्हणतात की समलैंगिकता पाश्‍चात्य देशातून आपल्याकडे आली आहे, म्हणून तिचा स्वीकार करणं कठीण. असं म्हणणार्‍यांनी रामायण – महाभारतातल्या अर्जुन-बृहन्नडेसारख्या संदर्भाकडे दुर्लक्ष केलंय यात तिळमात्र शंका नाही.
समाजाला जर कळायला हवं तर या विषयावरचं वाचन वाढायला हवं. या विषयावर येणारे चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहायला हवीत. विजय तेंडुलकरांचं ‘मित्राची गोष्ट’ नावाचं अतिशय सुंदर नाटक आहे, ज्यावर हल्लीच बायोस्कोप नावाच्या फीचर फिल्ममधे मित्रा नावाची शॉर्ट फिल्म केली आहे. फायर नावाचा चित्रपट आहे आयक्यूरिओसिटीवर आधारून. खूप सारी पुस्तकं आहेत, भारतीय लेखकांचीही आहेत. इंटरनेटवर भलीमोठी यादी मिळेल, मागवून वाचायला हरकत नाही. आणि फक्त वाचूनच सोडून द्यायचं नाही, तर विचारमंथन करून त्यावर लिहायची गरज आहे. मोकळेपणानं बोलायची गरज आहे. बाकीच्या नात्यांप्रमाणे याही नात्यांना सांभाळण्यास मदत करायची गरज आहे.
आमच्या पिढीतल्या लेखकांनी ह्या विषयावर लिहिल्यास जो काही होमोफोबिया आणि द्वेष आहे तो दूर होईल याची खात्री आहे. कायद्यानं मान्यता मिळावीच, पण समाजानं आधी मान्यता दिली तर एक आधार वाटतो, आत्मविश्‍वास मिळतो. आणि ज्यात प्रेमच नाही अशा समाजमान्य नात्यापेक्षा प्रेमानं भरलेलं; पण अमान्य नातं परवडलं. हो ना? शेवटी एक पत्र, जे ऍलन चेंबर्सने लिहिलेलं, जो एग्झोड्‌स इंटरनेशनल या संस्थेचा प्रेसिडेंट होता………