प्रा. सुभाष वेलिंगकरांची आमदार सावळांशी चर्चा

0
63

भारतीय भाषा सुरक्षा मंचाने प्रत्येक मतदारसंघात आपले कार्य गतिमान केले असून काल डिचोलीत प्रमुख कार्यकर्त्यांसमोर विषय मांडल्यानंतर मंचाचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आमदार नरेश सावळ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सुमारे २० मिनिटे चर्चा केली.

भाजपची भूमिका व राजकीय पातळीवर चाललेले डावपेच याविषयी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सावळ यांनी भाभासुमंला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी वेलिंगकर यांच्या समवेत सुभाष देसाई व आत्माराम गावकर उपस्थित होते. राजकीय पातळीवर भाभासुमं आक्रमक झालेला असून मगो-भाजप युतीकडे नजर ठेवून आहे.