प्रत्येक पालिकेसाठी मास्टर प्लॅन; प्रस्ताव विचाराधीन : मंत्री राणे

0
29

राज्यातील प्रत्येक नगरपालिकेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली. राणे यांनी काल नगरविकास खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली.

नगरपालिकांसाठी मास्टर प्लॅन तयार करताना स्थानिक नगरपालिका मंडळाला विश्‍वासात घेण्यात येणार आहे, असे राणे यांनी सांगितले. नगरपालिका क्षेत्रातील पूर्ण झालेले प्रकल्प, प्रलंबित प्रकल्प आणि नवीन प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यावर विचारविनिमय करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली आहे. नगरविकासच्या विविध सेवांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे, असेही राणे म्हणाले.