प्रत्येक तालुक्यांतून हजारभर मराठीप्रेमी उपस्थित राहणार

0
98

>> मराठी निर्धार मेळावा

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने विधानसभेचे अधिवेशन घेऊन मराठीला राजभाषेचे स्थान देणारे विधेयक संमत करावे या मागणीसाठी मराठी राजसभा समितीतर्फे दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथील आझाद मैदानावर मराठीप्रेमींचा निर्धार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला आजी माजी आमदार तसेच प्रत्येक तालुक्यांतून किमान एक हजार मराठींप्रेमींची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत मराठी राजभाषा समितीचे प्रमुख कार्यवाह मंगेश कुंडईकर यांनी काल दिली.
कुंडईकर म्हणाले, की गेली ५२ वर्षे सातत्याने मराठी राजभाषा व्हावी यासाठी मराठीप्रेमी जनता सरकार दरबारी लढत आहे. या लढ्याला न्याय मिळावा व मराठीला हक्काचे राजभाषेचे स्थान मिळावे हा या निर्धार मेळाव्या मागचा उद्देश आहे. सरकारने आजपर्यंत मराठीप्रेमींच्या या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात आठ आमदारांनी मराठी राजभाषेचा ठराव मंजूर करून घेतला होता. परंतु त्यानंतर सरकारने कोणतीही पावले उचललेली नसल्याची टीका त्यांनी केली. समितीचे कार्याध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी मराठी राजभाषा झाली नाही तर शिक्षणाला काहीच महत्त्व राहणार नाही. तेव्हा भाभासुमंचने या चळवळीला पाठिंबा द्यावा व आपल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाच्या जाहीरनाम्यात मराठी राजभाषेचा विषय समाविष्ट करावा असे आवाहन केले.