पुढील सुनावणीपर्यंत मांडवीत कॅसिनो सुरू करणार नाही

0
78

>> गोपाळ कांडा यांच्या कंपनीचे प्रतिज्ञापत्र

 

उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी होईपर्यंत मांडवी नदीत कॅसिनो सुरू करणार नसल्याचे हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा. लिमिटेड या कंपनीने काल उच्च न्यायालयात सांगितले. सरकारने परवाना दिला तरीही कंपनी कॅसिनो सुरू करणार नसल्याचे यावेळी कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, कांडा यांच्या कंपनीला मांडवी नदीत कॅसिनो सुरू करण्यासाठी परवाना देण्यात आला नसल्याचे यावेळी सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले. गोपाळ कांडा यांच्या कॅसिनो जहाजाच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या हालचालींना ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. काल याचिका सुनावणीस आली असता त्यासंबंधीची पुढील सुनावणी न्यायमूर्ती महेश सोनक यांनी येत्या १५ रोजी मुक्रर केली. मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या परवान्यांचा काळ संपला आहे. त्या कॅसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण करायचे नाही, असा निर्णय २०१३ साली मंत्रीमंडळाने घेतला होता, याकडेही ऍड. रॉड्रिग्ज यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.