प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

0
147

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. श्री. मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले असून त्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करत दिली होती. त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या मेंदूत असलेली एक गाठ या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.