प्रणव मुखर्जी अत्यवस्थ

0
132

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा कोमात गेले असून व्हेंटिलेटरवर आहेत अशी माहिती काल त्यांच्यावर उपचार करणार्‍या इस्पितळाच्या सूत्रांनी दिली.

८४ वर्षीय श्री. मुखर्जी यांच्यावर फुफ्फुसाच्या विकारावरील उपचार सुरू आहेत. कालपासून त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्री. मुखर्जी यांना लष्कराच्या इस्पितळात १० ऑगस्ट रोजी भरती करण्यात आले होते. भरती करतेवेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. श्री. मुखर्जी हे देशाचे तेरावे राष्ट्रपती होते. २०१२ ते २०१७ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळला आहे.