पोलीस शिपाई पदांसाठीच्या भरतीत १०१ गृहरक्षकांची निवड

0
7

गोवा पोलीस खात्यात काम करणार्‍या गृहरक्षकांना पोलीस शिपाई पदांसाठीच्या भरतीत १० टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून, या पदांसाठीच्या भरतीत उत्तीर्ण झालेल्या १०१ उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. याशिवाय १० जणांची प्रतीक्षा यादी देखील जाहीर करण्यात आली. पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी याबाबतचा आदेश काढला.

या भरतीत गृहरक्षकांना सामावून घेण्यासाठी पोलीस शिपायांची १० टक्के पदे त्यांच्यासाठी राखीव ठेवली आहेत. त्यासाठी राज्य सरकारने भरती नियमांत बदल करून नवीन नियम लागू केला आहे. पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या १० गृहरक्षकांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे.

पोलीस खात्यात ३८०१ पोलीस शिपायांची पदे अधिसूचित केलेली असून, त्यातील ९० टक्के पदे थेट भरण्यात येणार आहेत, तर १० टक्के पदे गृहरक्षकांसाठी राखीव ठेवली आहेत. त्यासाठी गृहरक्षकांना किमान पात्रता दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय ५० पेक्षा जास्त वय असू नये. तसेच १० वर्षांच्या सेवेची अट देखील घालण्यात आली आहे.