पोलीस महासंचालपदासाठी उद्या निर्णयाची शक्यता

0
150

केंद्रीय गृह खात्याकडून गोव्याच्या नवीन पोलीस महासंचालक नियुक्तीबाबत येत्या २६ डिसेंबर २०१९ रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले आहे. नवीन पोलीस महासंचालकांची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. नवी दिल्ली येथे २६ डिसेंबरला होणार्‍या संयुक्त केडर प्राधिकरणाच्या बैठकीत नवीन पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.