गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांनी १६ ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्यातील गोकर्ण या ठिकाणी जाण्यास जीए ०८ जी ००६४ या क्रमाकांच्या सरकारी वाहनाचा दुरुपयोग करीत ३९६ किलोमीटरचा खाजगी प्रवास केला असून त्यामुळे सरकारी तिजोरीला नुकसान झाले असल्याची तक्रार ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी पणजी पोलीस स्थानकात काल दाखल केली आहे.
सरकारच्या नियमानुसार सरकारी वाहन राज्याबाहेर न्यायचे झाल्यास त्यासाठी मुख्य सचिवांची लेखी परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे, याकडे ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी तक्रारीत लक्ष वेधले आहे. पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांची सदर कृती भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा असून शिक्षापात्र असल्याचेही आयरिश यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे.