पोटनिवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
10

राज्यातील दहा ग्रामपंचायतींच्या दहा प्रभागांत 23 जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पंचायत पोटनिवडणुकीतून पाच जणांनी माघार घेतली आहे. सुकूर पंचायतीच्या प्रभाग 10 (एससी) मध्ये 4 उमेदवार, कुडणे पंचायतीच्या प्रभाग 2 (सर्वसामान्य) मध्ये 2 उमेदवार, वळवई प्रभाग 2 (सर्वसामान्य) मध्ये 2 उमेदवार, केरी पंचायत प्रभाग 3 (एसटी) मध्ये 3 उमेदवार, कुंडई पंचायत प्रभाग 7 (महिला) मध्ये 4 उमेदवार, बोरी पंचायत प्रभाग 11 (सर्वसामान्य) मध्ये 3 उमेदवार, राशोल पंचायत प्रभाग 5 (एसटी महिला) मध्ये 2 उमेदवार, सेरावली पंचायत प्रभाग 2 (महिला) मध्ये 2 उमेदवार, असोळणा पंचायत प्रभाग 1 (महिला) मध्ये 2 उमेदवार आणि शेल्डे पंचायत प्रभाग 2 (ओबीसी) मध्ये 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.