पेडण्यातील ३ पंचायतींसाठी ९१ टक्के मतदान

0
136

पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे आणि चांदेल – हंसापूर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ९१.७७ टक्के मतदान झाले.
या तीन पंचायतींसाठी काल सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेण्यात आले. हळर्ण पंचायतीच्या सहा प्रभागात ९२.८९ टक्के, कासारवर्णे पंचायतीच्या पाच प्रभागात ९३.९९ टक्के आणि चांदेल – हंसापूर पंचायतीच्या पाच प्रभागात ८९.६१ टक्के मतदान झाले. तसेच पेडणे तालुक्यातील पालये पंचायतीच्या प्रभाग १ च्या पोटनिवडणुकीसाठी ९१.५३ टक्के मतदान झाले. फोंडा तालुक्यातील मडकई पंचायतीच्या प्रभाग २ च्या पोटनिवडणुकीत ८०.८२ टक्के आणि कुंडई पंचायतीच्या प्रभाग १ च्या पोटनिवडणुकीत ८२.२० टक्के मतदान झाले. सांगे तालुक्यातील उगे पंचायतीच्या प्रभाग ७ च्या पोटनिवडणुकीत ८२.८८ टक्के मतदान झाले आहे.