>> केंद्र सरकारच्या कर कपातीनंतर रविवारपासून राज्यात नवे दर लागू
केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्यानंतर राज्यात नवे रविवारपासून लागू झाले. उत्तर गोव्यात पेट्रोल ९७.९० रुपये, तर डिझेल ९०.४४ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर दक्षिण गोव्यात पेट्रोलचा दर ९७.७५ रुपये आणि डिझेलचा दर ९०.२९ रुपये प्रति लिटर असा आहे.
केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय शनिवारी जाहीर केला होता. केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी कर ८ रुपयांनी, तर डिझेलवरील कर ६ रुपयांनी कमी केला.
या कर कपातीनंतर उत्तर गोव्यात पेट्रोल ८.७७ रुपयांनी कमी झाले असून, नवे दर ९७.९० रुपये असे आहेत. तर डिझेल ७.१० रुपयांनी कमी झाले असून, नवे दर ९०.४४ रुपये असे आहेत.
दक्षिण गोव्यात पेट्रोल ८.४३ रुपयांनी कमी झाले असून, नवे दर ९७.७५ रुपये असे आहेत, तर डिझेल ६.७८ रुपयांनी कमी झाले असून, नवे ९०.२९ रुपये असे आहेत.
केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर हळूहळू इंधनाच्या दरात वाढ केली होती. २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात १० रुपये प्रति लिटर एवढी वाढ झाली होती. त्यामुळे गोव्यात पेट्रोलचा दर १०६ रुपयांवर, तर डिझेलचा दर ९७ रुपयांवर पोहोचला होता.