पंतप्रधान आजपासून जपान दौर्‍यावर

0
13

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल रात्री जपानच्या दौर्‍यावर रवाना झाले. २३ आणि २४ मे रोजी जपानची राजधानी टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या दौर्‍यात मोदी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. जपान दौर्‍यात मोदी २३ बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. त्यातील तीन बैठका तीन राष्ट्राध्यक्षांसोबत देखील होणार आहेत. मोदी जवळपास ४० तास जपानमध्ये असणार आहेत.

पंतप्रधान मोदी जपानमध्ये २३ मे रोजी पोहोचतील आणि बिझनेस लीडर्ससोबतच विविध कंपनींच्या सीईओंसोबत चर्चा करतील. त्यानंतर ते भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. २४ मे रोजी क्वाड परिषदेत सहभाही होतील. मोदी जपानच्या जवळपास ३५ प्रमुख बिझनेस लीडर्सची भेट घेणार आहेत. यात कंपन्यांचे सीईओ, चेअरमन आणि अध्यक्षांचा समावेश असणार आहे, असे जपानमधील भारतीय दूतावासाचे राजदूत एस. के. वर्मा यांनी सांगितले.