पूल दुर्घटना : १५ मृतदेह सापडले : ४२ जण बेपत्ता

0
77

मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी मध्यरात्री कोसळल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश काल महाराष्ट्र सरकारने दिले. या दुर्घटनेवेळी दोन एस. टी. महामंडळाच्या बसगाड्यांसह काही खाजगी वाहने गेली असून कालपर्यंत शोध पथकांच्या हाती १५ मृतदेह लागल्याचे वृत्त आहे. ४२ जण बेपत्ता आहेत. न्यायालयीन चौकशीची अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधानसभेत केली. मुंबईहून १७० कि. मी. वरील महाडनजीकच्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या दोन बसगाड्यांवर कर्मचार्‍यांसह २२ लोक होते अशी माहिती आहे. मात्र मोठ्या प्रमाणातील शोध पथकांच्या ४० तासांहून अधिक वेळेच्या अथक प्रयत्नांनंतरही यंत्रणांच्या हाती फक्त पाच मृतदेह लागले आहेत. या पाचपैकी ३ पुरुषांचे तर दोन महिलांचे मृतदेह असल्याची माहिती रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. हे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात असल्याचे ते म्हणाले. या शोधकार्यात नौदल, एनडीआरएफ व तटरक्षक दलाच्या सुमारे १६० जवानांसह २० बोटींसह स्थानिक मच्छीमार व राफटर्स गुंतले आहेत. स्थानिक प्रशासनाने या दुर्घटनेत सापडलेल्यांच्या निकटवर्तीयासाठी सहाय केंद्र उभारले आहे.

दरम्यान, त्याआधी पाण्यात गायब झालेल्या बसगाड्यांच्या शोधासाठी ३०० किलो वजनाचे लोहचुंबकही पाण्यात सोडण्यात आले होते. यावेळी या लोहचुंबकाकडे काही तरी अडकून राहिल्याचे जाणवले ते पाण्याबाहेर खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
पाण्याच्या तीव्र वेगामुळे शोधकार्यात अडथळा
या शोध मोहिमेत सहभागी झालेल्या एनडीआरएफच्या एका जवानाने तीन तासांनी नदीतून बाहेर आल्यानंतर सांगितले की पाण्याचा प्रवाह अजूनही अत्यंत वेगवान असल्याने मोठा अडथळा होत आहे. परंतु आमच्यासाठी काही फरक पडत नसून आमचे जोरदार प्रयत्न सुरूच राहतील.