Home बातम्या पुनितकुमार गोयल यांना शिक्षेऐवजी पदोन्नती : काँग्रेस पक्षाचा आरोप

पुनितकुमार गोयल यांना शिक्षेऐवजी पदोन्नती : काँग्रेस पक्षाचा आरोप

0

शेतजमिनीचे बेकायदेशीररित्या रुपांतरण केल्याचा आरोप असलेले गोव्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांची गोव्यातून बदली करण्यात आलेली असली तरी त्यांची दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करून केंद्र सरकारने त्यांची पदोन्नती केली आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. एखादे चांगले काम केलेल्या अधिकाऱ्याला पदोन्नती देतात त्याप्रकारे गोयल यांना बढती का देण्यात आली हे सरकारने स्पष्ट करावे, असे पाटकर यांनी म्हटले आहे. गैरकृत्ये करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना जर सरकारने अशा प्रकारे बढती देणे सुरू केले तर अधिकाऱ्यांना अशा प्रकारची गैरकृत्ये करण्यास वाव दिल्यासारखे होईल, अशी भीती पाटकर यांनी व्यक्त केली आहे.
भू रुपांतरासारखी गंभीर प्रकारची गैरकृत्ये करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबितच करायला हवे, असेही पाटकर यांनी म्हटले आहे. ही पदोन्नती गोयल यांच्या गैरकृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी करण्यात आली आहे का, असा सवालही पाटकर यांनी केला आहे.