पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या सॅनिटायझर बनवणार्या कंपनीला काल दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला. काही कामगार बेपत्ता आहेत, तर १९ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.
चिंताजनक बाब म्हणजे या कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या कंपनीत सॅनिटायझरसह अन्य केमिकल्स देखील तयार केले जातात. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर देखील पसरला आहे.