नवे शैक्षणिक वर्ष २१ जूनपासून सुरू

0
119

राज्यातील यंदाचे शैक्षणिक वर्ष दि. २१ जूनपासून सुरू होणार असल्याचे काल शिक्षण खात्याने स्पष्ट केले. शाळेत नियमितपणे शिक्षण प्रक्रिया चालणार की ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार याचा निर्णय नवे शैक्षणिक सुरू होण्याच्या एक आठवडा अगोदर घेतला होणार आहे.
यासंबंधी शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत यांनी माहिती दिली.

२०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष चालू महिन्याच्या २१ तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे की ऑनलाईन वर्ग घ्यावेत यासंबंधीचा निर्णय आठवडाभराअगोदर घेण्यात येणार असल्याचे दिलीप भगत यांनी सांगितले.