देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवल्यानंतर भारत सरकारने लसींची निर्यात बंद केली होती. आता पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना अतिरिक्त लसींची निर्यात करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल दिली.
ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये अतिरिक्त डोसची निर्यात होणार आहे. देशात आतापर्यंत ८१ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये भारत सरकारला भारतीय कंपन्यांनी बनवलेले २६ कोटी लसींचे डोस मिळाले. पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये आम्हाला ३० कोटींपेक्षा जास्त डोस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून केंद्र सरकार लसींची निर्यात करेल, असे मांडवीय यांनी सांगितले.