पुढील आठवड्यात इफ्फीविषयक करार

0
86

प्रकाश जावडेकर येणार
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीच्या तथा इफ्फीच्या पायाभूत सुविधा व अन्य कामाच्या तयारीसाठी पुढील आठवड्यात समझोता करार होणार असून त्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत सुकाणु समितीची बैठक याच काळात होणार आहे.
गोवा मनोरंजन सोसायटीने (ईएसजी) सध्या महोत्सवाची तयारी सुरू केली आहे. गोव्यात चित्रपट संस्कृती रूजावी म्हणून ईएसजीने खर्‍या अर्थाने आता प्रयत्न सुरू केले आहेत.
दिगंत हा एकमेव चित्रपट वगळता डीडीवर एकही गोव्यातील चित्रपट प्रक्षेपित झालेला नाही. प्रसार भारतीने त्यासाठी यापूर्वी जाहिरात प्रसिध्द केली होती. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फिचर चित्रपट डीडीवर प्रक्षेपित केल्यास निर्मार्त्यांना २५ लाख रुपये मिळतात.
अन्य निर्मात्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रसार भारतीला मुदत वाढविण्याची विनंती केली आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर निर्मात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले आहे.