पीडीए अध्यक्षपदी जेनिफर मोन्सेरात

0
32

उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या (पीडीए) अध्यक्षपदी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्राधिकरणावर एकूण चौदा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यात कळंगुट, म्हापसा, साळगाव, थिवी, शिवोली आणि हळदोणा या सहा मतदारसंघांतील आमदारांचा समावेश आहे. तसेच, या प्राधिकरणावर सुशांत हरमलकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, रुपेश कामत, पेद्रू कुतिन्हो, सागर नाईक, मारियो फर्नांडिस, गुरुदास शिरोडकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.