हसन खान खूनप्रकरणी पाच दोषींना जन्मठेप

0
43

२०१३ साली ताळगाव येथे झालेल्या हसन खान यांच्या खून प्रकरणी काल सत्र न्यायालयाने पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सत्र न्यायालयाने १६ ऑगस्ट रोजी या आरोपींना खून प्रकरणी दोषी ठरवले होते. शिक्षा ठोठावण्यात आलेले हे सर्व पाचही आरोपी बेळगाव येथील आहेत. अभिनंदन पटेल, अनिल देसाई, रवी पाटील, अनिकेत यळ्ळूरकर व अरुण पाटील अशी दोषींची नावे आहेत.

या प्रकरणातील एक कथित मास्टरमाईंड आणि खाण खात्यातून निलंबित केलेला अधिकारी रॉबर्ट गोन्साल्वीस व अन्य एक संशयित शिवाजी पाटील यांची यापूर्वीच या खून खटल्यातून पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे.

हसन खान हा रिअल इस्टेट उद्योगात होता. तसेच त्याची एक गॅरेज देखील होती. २०१३ साली गोन्साल्वीस याने कथितरित्या सुपारी देऊन बांबोळी येथे त्याचा खून केला, असा आरोप होता. खान याचा मृतदेह बांबोळीत त्याच्याच वाहनात सापडला होता. आगशी पोलिसांनी या प्रकरणी तपासकाम केले होते.