पीडित मुलीच्या ‘बोन टेस्ट’ अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा

0
88

>>आमदार बाबुश बलात्कार प्रकरण

सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी कथित बलात्कार केलेल्या पीडित मुलीची काल ‘बोन टेस्ट’ करण्यात आली. पीडितेचे नक्की वय किती, ती अल्पवयीन आहे की प्रौढ हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पीडितेचे दोन जन्म दाखले सापडलेले असून त्यामुळे तिचे नक्की वय किती हे पोलिसांना कळू शकलेले नाही. त्यामुळे ‘बोन टेस्ट’चा पर्याय पोलिसानी निवडलेला आहे. काल बोन टेस्ट करण्यात आलेली असली तरी अहवाल मात्र हाती आला नसल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. अहवाल हाती आल्यानंतरच पीडितेचे वय किती हे पोलिसांना कळू शकणार आहे.
रोझीला आणखी
२ दिवसांचा रिमांड
दरम्यान, पीडितेला बाबुश मोन्सेर्रात यांना ५० लाखांना विकण्याचा सौदा केल्याचा आरोप असलेली महिला रोझी फेर्रोझ हिचा ३ दिवसांचा पोलीस रिमांड संपल्याने काल तिला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तिला आणखी २ दिवसांचा पोलीस कोठडीचा रिमांड दिला.