गोव्यात पावसाची शक्यता

0
99

गोव्यात पावसाची शक्यता असून येत्या दोन दिवसात राज्यात पाऊस कोसळू शकतो, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे. गोव्यातील विविध भागात या मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून यावेळी गडगडाटासह वादळी वार्‍याची श्कयता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात तापमान प्रचंड वाढलेले आहे.