पीओपी गणेशमूर्तींची विक्री केल्यास परवाना रद्द होणार

0
17

>> पर्यावरण खात्याच्या संचालकांचा इशारा

राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींची विक्री करणार्‍या विक्रेत्यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याचा इशारा पर्यावरण व हवामान बदल खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी दिला आहे. पर्यावरण खात्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना गोव्यात प्रवेश बंदीबाबतची माहिती वाहतूक, पोलीस, व्यवसाय कर व इतर १४ खात्यांना माहिती दिली आहे. पीओपी गणेशमूर्तींवर बंदी असताना त्या राज्यात आणल्यास सदर मूर्ती ताब्यात घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई केली जाणार आहे, असेही रेडकर यांनी म्हटले आहे.