पाळोळे युनायटेड बॉईजला सीआरसी चिंचणी चषक

0
73

मडगाव (क्री.प्र.)
युबी पाळोळे बॉईजने फातोर्डाच्या डॉन बॉस्को ओरेटरीला २-० अशी धूळ चारत सीआरसी चिंचणी चषक आंतरग्राम फुटबॉल स्पर्धा जिंकली. पाळोळेकडून रेहेनर डिसोझा याने टॅरेन्स लोबोच्या पासवर दुसर्‍या सत्रात पहिला गोल केला. टॅरेन्स लोबोच्या क्रॉसवर कायतानो फर्नांडिस याने दुसर्‍या गोलाची नोंद केली. ओरेटरीला अथक प्रयत्नांनंतरही पाळोळेचा बचाव भेदता आला नाही.
विजेत्या पाळोळे संघाने ४० हजार रुपये व झळाळत्या करंडकाची कमाई केली. डीबीओला ३० हजारांवर समाधान मानावे लागले.
बक्षीस वितरण समारंभला मडगावचे उपजिल्हाधिकारी (महसूल) परेश फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी जीएफए अध्यक्ष एल्विस गोम्स, चिंचणी-देवसुआचे उपसरपंच वालेंटिनो बार्रेटो, जीएफएचे कार्यकारी सदस्य अँथनी पांगो आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण केले.
वैयक्तिक बक्षिसे ः सर्वोत्तम गोलरक्षक ः मायरन गोम्स (नावेली एससी), उदयोन्मुख खेळाडू ः लुई नोरोन्हा (चांदर एससी), सर्वोत्तम मध्यरक्षक ः टॅरेन्स लोबो (युबी पाळोळे), पहिली हॅट्‌ट्रिक ः रांचेर डिसोझा (युबी पाळोळे), सर्वोत्तम आघाडीपटू ः व्हर्नोन फर्नांडिस (कुडतरी जिमखाना), शिस्तबद्ध संघ ः तिळामळ स्पोटर्‌‌स क्लब, आश्‍वासक खेळाडू ः न्यूटन फर्नांडिस (सेंट रॉक कलाटा), स्फुरणीय खेळाडू ः वेलटन डिसोझ (डीबीओ फातोर्डा), सर्वोत्तम गोल ः टॅरेन्स लोबो (युबी पाळोळे).