पार्किंग प्रकल्पाचे आज उद्घाटन

0
107

पाटो, पणजी येथील सांता मोनिका जेटीजवळील अद्ययावत पार्किंग प्रकल्पाचे आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ९० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प साधन सुविधा महामंडळामार्फत उभारण्यात आला आहे. राजधानी पणजीत होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

चार मजली इमारतीत ४०० कारगाड्या पार्किंग करण्याची सुविधा असून तळमजल्यावर १० बसेस पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी दोन लिफ्टची सोय आहे. व्यंकट राव प्रोजेक्ट्‌स प्रा. लि. या कंपनीचे हा प्रकल्प साकारला आहे. राहुल देशपांडे यांनी आराखडा तयार केला होता.

‘पेडीबस’सेवेचा आज शुभारंभ
गोवा पर्यटन महामंडळातर्फे आजपासून पर्यावरणप्रिय पेडी बससेवा सुरू करण्यात येणार असून या सेवेचा शुभारंभ आज सकाळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते होईल. दहा पर्यटकांना बसण्याची सोय असलेली ही बससेवा पर्यटकांना वेगळा थरार देणारी ठरेल. युरोप खंडात तसेच उत्तर अमेरिकेत पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेली ही सेवा भारतात पहिल्यांदाच सुरू होणार आहे. हेता आणि हर्ष पटेल या युवा उद्योजकांनी ही सेवा गोव्यात सुरू करण्यास पसंती दिली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

  • एकूण खर्च ९० कोटी
  • चार मजली इमारत.
  • तळमजल्यावर बसेस पार्किंग
  • ४०० कारगाड्या पार्किंगची सोय
  • प्रवाशांच्या सोयीसाठी २ लिफ्ट