पाक इंग्लंडपेक्षा सरस ः इंझमाम

0
176

पाकिस्तानचा संघ इंग्लंडपेक्षा नक्कीच सरस आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीतील पराभव मागे टाकून अझर अली याचा संघ मालिका नक्कीच जिंकेल, असा विश्‍वास पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने व्यक्त केला आहे.

पाकिस्तानकडून १२० कसोटींत ८८३० व ३७८ वनडेंत १७३९ धावा केलेला इंझमाम म्हणाला की, विजयाच्या स्थितीतून पाकिस्तानचा पराभव झालेला पाहणे दुर्देवी होते. परंतु, सामना गमावला म्हणजे सर्वकाही गमावले असे नक्कीच नाही. दुसरी कसोटी दिमाखात जिंकून पाकिस्तानचा संघ नक्कीच आपला लौकीक दाखवेल.
‘दुसर्‍या डावात फलंदाजी ढेपाळल्यानंतर खेळाडू निराश झाले होते. यावेळी संघ व्यवस्थापनाने खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करणे आवश्यक होते. कठीण काळातून जात असताना तुमच्या देहबोलीमध्ये बदल दिसून चालत नाही. दुसर्‍या डावात फलंदाजी कोसळल्यामुळेच सर्व खेळाडू दबावाखाली दिसून आले,’ असे मत इंझमामने व्यक्त केले.

कर्णधार अझर अली याच्या नेतृत्वशैलीवर देखील इंझमामने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. इंग्लंडचा संघ दबावाखाली असताना अझरने गोलंदाजीत केलेले बदल इंझमाम याला भावले नाहीत.