पाकिस्तान सोडून १२० देशांत होणार थेट प्रक्षेपण

0
89

जगतील सर्वांत मोठी टी-२० क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. स्पर्धेस मोजकेच दिवस बाकी असून सर्व संघ जोरदार तयारी करीत आहेत. स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे थेट प्रसारण पाकिस्तान सोडल्यास १२० देशांत होणार आहे. भारतात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, बांगला, मल्याळम आणि मराठी या सहा स्थानीय भाषांमध्ये या स्पर्धेचे समालोचन होणार आहे.

प्रेक्षक हॉटस्टारवरही थेट प्रसारण पाहू शकतील. परंतु त्यासाठी वापरकर्त्यांना ‘प्रीमियर मेंबरशिप’ची गरज असेल. इंग्लंड-आयर्लंडमध्ये स्काइ स्पोर्टस्, अमेरिका-कॅनडात विलो टीव्ही तर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये फॉक्स स्पोर्टस् चॅनलवर सामने पाहायला मिळतील. पाकिस्तानात मात्र स्पर्धेचे थेट प्रसारण होणार नाही आहे. त्याच बरोबर अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये आयपीएलच्या प्रसारणासाठी स्टार स्पोर्टस्‌कडून स्थानिक प्रसारकांकडे बोलणी चालू आहे.