पाकिस्तान सर्वबाद १९१

0
103

श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्स्तानचा डाव अवघ्या १९१ धावांत आटोपला. लंकेची सुरुवातही अडखळती झाली असून ६४ धावांत त्यांचे तीन गडी तंबूत परतले आहेत.

पाकिस्तानचा कर्णधार अझर अली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. मसूद (१०) व अझर (०) यांना बाद करत विश्‍वा फर्नांडोने पाकची २ बाद १० अशी केविलवाणी स्थिती केली. आबिद अली (३८) व बाबर आझम (६०) यांनी तिसर्‍या गड्यासाठी ५५ धावा जोडत संघाचा कोसळता डोलारा काही प्रमाणात सावरला. बाबर व शफिक (६३) यांनी चौथ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी करत लंकेच्या गोलंदाजांना सहजासहजी यश मिळू दिले नाही. ३ बाद १२७ अशी सुस्थितीत असताना पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिले व ५९.३ षटकांत त्यांचा डाव १९१ धावांत संपला.

श्रीलंकेकडून लाहिरु कुमारा याने ४९ धावांत ४, लसिथ एम्बुलदेनियाने ७१ धावांत ४ तर विश्‍वाने ३१ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने ओशादा फर्नांडो (४), दिमुथ करुणारत्ने (२५) व कुशल मेंडीस (१३) हे आघाडीचे तीन खेळाडू गमावले आहे.

दिवसअखेर अँजेलो मॅथ्यूज ८ व नाईट वॉचमन लसिथ एम्बुलदेनिया ३ धावांवर नाबाद आहेत. पाककडून अब्बासने २ तर आफ्रिदीने १ गडी बाद केला आहे.