कमिन्ससाठी केकेआरने मोजले १५.५० कोटी

0
127

इंडियन प्रीमियरचा छोटेखानी लिलाव काल गुरुवारी कोलकाता येथे पार पडला. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स १५.५० कोटींसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात घेतले. ग्लेन मॅक्सवेल (किंग्स इलेव्हन पंजाब), ख्रिस मॉरिस (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर), शेल्डन कॉटरेल (किंग्स इलेव्हन पंजाब), नॅथन कुल्टर नाईल (मुंबई इंडियन्स) यांनीदेखील बक्कळ कमाई केली. फ्रेंचायझींनी कालच्या लिलावात ६२ खेळाडूंना १४०.३ कोटी मोजून आपल्या संघात सामावून घेतले.

चेन्नई सुपर किंग्स पीयुष चावला (लेगस्पिन गोलंदाज, भारत, ६.७५ कोटी), सॅम करन (अष्टपैलू, इंग्लंड, ५.५० कोटी), जोश हेझलवूड (जलदगती गोलंदाज, ऑस्ट्रेलिया, २ कोटी), आर. साई किशोर (डावखुरा संथगती गोलंदाज, भारत, २० लाख)
दिल्ली कॅपिटल्स शिमरॉन हेटमायर (फलंदाज, वेस्ट इंडीज, ७.७५ कोटी), मार्कुस स्टोईनिस (अष्टपैलू, ऑस्ट्रेलिया, ४.८० कोटी), आलेक्स केरी (यष्टिरक्षक, ऑस्ट्रेलिया, २.४० कोटी), जेसन रॉय (फलंदाज, इंग्लंड, १.५० कोटी), ख्रिस वोक्स (अष्टपैलू, इंग्लंड, १.५० कोटी), मोहित शर्मा (मध्यमगती गोलंदाज, भारत, ५० लाख), तुषार देशपांडे (जलद मध्यमगती गोलंदाज, भारत, २० लाख), ललित यादव (अष्टपैलू, भारत, २० लाख).

किंग्स इलेव्हन पंजाब ग्लेन मॅक्सवेल (अष्टपैलू, ऑस्ट्रेलिया, १०.७५ कोटी), शेल्डन कॉटरेल (डावखुरा जलद मध्यमगती गोलंदाज, वेस्ट इंडीज, ८.५० कोटी), ख्रिस जॉर्डन (अष्टपैलू, इंग्लंड, ३ कोटी), रवी बिश्‍नोई (लेगब्रेक गुगली गोलंदाज, भारत, २ कोटी), प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक, भारत, ५५ लाख), दीपक हुडा (अष्टपैलू, भारत, ५० लाख), जिमी नीशम (अष्टपैलू, न्यूझीलंड, ५० लाख), तजिंदर धिल्लॉ (अष्टपैलू, भारत, २० लाख), ईशान पोरेल (मध्यमगती गोलंदाज, भारत, २० लाख).
कोलकाता नाईट रायडर्स पॅट कमिन्स (जलदगती गोलंदाज, ऑस्ट्रेलिया, १५.५० कोटी), ऑईन मॉर्गन (फलंदाज, इंग्लंड, ५.२५ कोटी), वरुण चक्रवर्ती (लेगस्पिन गोलंदाज, भारत, ४ कोटी), टॉम बँटन (फलंदाज, इंग्लंड, १ कोटी), राहुल त्रिपाठी (फलंदाज, भारत, ६० लाख), ख्रिस ग्रीन (अष्टपैलू, ऑस्ट्रेलिया, २० लाख), निखिल नाईक (यष्टिरक्षक, भारत, २० लाख), प्रवीण तांबे (लेगस्पिन गोलंदाज, भारत, २० लाख), एम सिद्धार्थ (डावखुरा संथगती गोलंदाज, भारत, २० लाख).

मुंबई इंडियन्स नॅथन कुल्टर नाईल (जलद मध्यमगती गोलंदाज, ऑस्ट्रेलिया, ८ कोटी), ख्रिस लिन (फलंदाज, ऑस्ट्रेलिया, २ कोटी), सौरभ तिवारी (फलंदाज, भारत, ५० लाख), दिग्विजय देशमुख (अष्टपैलू, भारत, २० लाख), प्रिन्स बलवंत राय सिंग (अष्टपैलू, भारत, २० लाख), मोहसिन खान (गोलंदाज, भारत, २० लाख).
राजस्थान रॉयल्स रॉबिन उथप्पा (फलंदाज, भारत, ३ कोटी), जयदेव उनाडकट (डावखुरा मध्यमगती गोलंदाज, भारत, ३ कोटी), यशस्वी जैसवाल (फलंदाज, भारत, २.४० कोटी), कार्तिक त्यागी (मध्यमगती गोलंदाज, भारत, १.३० कोटी), टॉम करन (अष्टपैलू, इंग्लंड, १ कोटी), अँडी टाय (मध्यमगती गोलंदाज, ऑस्ट्रेलिया, १ कोटी), अनुज रावत (यष्टिरक्षक, भारत, ८० लाख), डेव्हिड मिलर (फलंदाज, द. आफ्रिका, ७५ लाख), ओशेन थॉमस (जलदगती गोलंदाज, वेस्ट इंडीज, ५० लाख), अनिरुद्ध जोशी (अष्टपैलू, भारत, २० लाख), आकाश सिंग (डावखुरा मध्यमगती गोलंदाज, भारत, २० लाख).

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ख्रिस मॉरिस (अष्टपैलू, द. आफ्रिका, १० कोटी), ऍरोन फिंच (फलंदाज, ऑस्ट्रेलिया, ४.४० कोटी), केन रिचर्डसन (जलद मध्यमगती गोलंदाज, ऑस्ट्रेलिया, ४ कोटी), डेल स्टेन (जलदगती गोलंदाज, द. आफ्रिका, २ कोटी), इसुरु उदाना (अष्टपैलू, श्रीलंका, ५० लाख), शहाबाज अहमद (यष्टिरक्षक, भारत, २० लाख), जोशुआ फिलिप (यष्टिरक्षक, ऑस्ट्रेलिया, २० लाख), पवन देशपांडे (अष्टपैलू, भारत, २० लाख)
सनरायझर्स हैदराबाद मिचेल मार्श (अष्टपैलू, ऑस्ट्रेलिया, २ कोटी), प्रियम गर्ग (फलंदाज, भारत, १.९० कोटी), विराट सिंग (फलंदाज, भारत, १.९० कोटी), फाबियन ऍलन (अष्टपैलू, वेस्ट इंडीज, ५० लाख), संदीप बावनका (अष्टपैलू, भारत, २० लाख), संजय यादव (अष्टपैलू, भारत, २० लाख), अब्दुल समद (अष्टपैलू, भारत, २० लाख).