पाकिस्तानी खासदार भारतीय संसदेत बेदखल

0
76

खासगी भेटीवर आलेल्या पाकिस्तानच्या खासदारांच्या सतरा सदस्यीय पथकाच्या या दौर्‍याची संसदेत दखल घेण्यास लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी काल नकार दिला. त्यामुळे आपला अवमान झाल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे. सभापतींनी दिलेल्या वागणुकीने आम्ही व्यथित झालो आहोत असे या प्रतिनिधींनी सांगितले. अधिकृत दौरा असता तर नोंद घेतली गेली असती असे सांगण्यात आले.