पाकिस्तानमधील तुरुंगांत ४७० भारतीय नागरीक अडकून

0
89

सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने काल सादर केलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमधील तुरुंगांमध्ये ४७० भारतीय नागरीक शिक्षा भोगत आहेत. यामध्ये तब्बल ४१८ मच्छिमारांचा समावेश आहे असे या अहवालात म्हटले आहे.

हा अहवाल न्यायालयात विदेश व्यवहार मंत्रालयाने सादर केला आहे. तसेच भारतातील तुरुंगांमध्येही पाकिस्तानचे ३५७ नागरीक शिक्षा भोगत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. उभय देशांदरम्यानचे संबंध विविध कारणांमुळे सर्वसामान्य झालेले नसल्याने २०१३पासून तुरुंगविषयक भारत-पाक न्यायालयीन समित्यांची बैठक झालेली नाही अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. पाकिस्तानी कैद्यांमध्ये १०८ मच्छिमार आहेत.

२०१६पासून आतापर्यंत भारताने ११४ कैद्यांची सुटका केली आहे. त्यात ८३ मच्छिमारांचा समावेश होता. तर पाकिस्तानने ९५१ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे.