पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

0
102

जम्मूच्या अर्निया सेक्टरमध्ये परवाच्या दहशतवाद्यांशी चकमकीच्या घटनेनंतर काल पाकिस्तानी रेंजर्सकडून भारताच्या दिशेने गोळीबार करण्याची घटना घडली. आंतरराष्ट्रीय सीमेवरील हा गोळीबार काही काळ चालू होता. दरम्यान, भारताच्या सीमा सुरक्षा दलाने मात्र संयम पाळत, प्रत्यूत्तर देण्याचे टाळले.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मू भेटीच्या एक दिवस पाकिस्तानच्या बाजूने घुसलेल्या दहशतवाद्यांच्या लष्कराशी चकमकीत मृतांची संख्या ११ बनली असून यात तीन नागरिक व तीन जवान मारले गेले आहेत. अर्नियापासून १०० किलोमीटर अंतरावर मोदींची सभा झाली.