गोमेकॉत गोमंतकीय रुग्णांना प्राधान्य हवे : उपमुख्यमंत्री

0
85

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात बिगर गोमंतकीय रुग्णावर उपचार करण्यासाठी शुल्क आकारणार असा निर्णय झालेला नाही. परंतु बांबोळी इस्पितळात गोमंतकीय रुग्णांना प्राधान्य मिळाले पाहिजे. ते कसे करणे शक्य होईल यावर आपले चिंतन सुरु असल्याचे आरोग्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर सांगितले.शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात बांबोळी इस्पितळात गर्दी असते. या प्रश्‍नावर उपाय काढण्यासाठी वरील राज्यांकडेही चर्चा करण्याची तयारी आहे. सावंतवाडी, कारवार भागात सर्व सुविधा असलेली इस्पितळे उभारल्यास बांबोळी इस्पितळावर ताण पडणार नाही. बिगर गोमंतकीय रुग्णांकडून शुल्क आकारणे हा ताण कमी करण्यासाठीचा एक उपाय आहे. परंतु निर्णय घेतलेला नाही, असे डिसोझा म्हणाले.
या प्रश्‍नावर चर्चा चालू असतानाच मुख्यमंत्री पार्सेकर यांनी जिल्हा इस्पितळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.