Home बातम्या पहिल्या सुपरस्टारला अखेरचा निरोप

पहिल्या सुपरस्टारला अखेरचा निरोप

0

६९ वर्षीय राजेश खन्ना यांचे परवा ‘आशीर्वाद’ या त्यांच्या बंगल्यावर इस्पितळातून डिस्चार्ज दिल्याच्या दोन दिवसांनंतर निधन झाले होते. आरव या त्यांच्या नातवाने व जावई अक्षय कुमारने त्यांना अग्नी दिला.

अंत्यसंस्कारावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मनोज कुमार, राणी मुखर्जी, करण जोहर उपस्थित होते. काल सकाळी १० वा. आशीर्वाद बंगल्यावरून अंत्ययात्रा सुरू जाली. पार्थिव ठेवलेल्या ट्रकवर अक्षय कुमार, डिंपल कापाडिया व राजेश खन्ना यांची मुलगी रिंकी खन्ना उभे दिसत होते.