पश्‍चिम बंगालमध्ये प्रत्येक चौथी व्यक्ती कोरोनाबाधित

0
139

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाने स्थिती गंभीर होत आहे. राजधानी कोलकातामध्ये आता चाचण्या केलेल्यांमध्ये दर दोन व्यक्तींत एकजण पॉझिटिव्ह सापडत आहे. पश्चिम बंगालमध्ये रोज कोरोना रुग्णांचे नवे विक्रम होत आहेत. पूर्ण राज्याचा विचार केला तर प्रत्येक चौथी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येत आहे. अनेक नागरिकांमध्ये सौम्य किंवा अतिशय कमी लक्षणे आहेत. १ एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये २५,७६६ नागरिकांनी कोरोनाची चाचणी केली होती. यापैकी १२७४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ४.९ टक्के पॉझिटिव्हिटी दर होता. तर शनिवारी ५५,०६० जणांनी चाचणी केली. यात १४ हजार २८१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. हा पॉझिव्हिटी दर २५ टक्क्यांहून अधिक आहे.