पश्‍चिम बंगालच्या राज्यपालांनी दिले राष्ट्रपती राजवटीचे संकेत

0
262

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर गुरूवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा केंद्र सरकारने बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे अहवाल मागितला होता. हा अहवाल प्राप्त होताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी व मुख्य सचिवांना बोलावून घेतले असून बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, काल झालेल्या नड्डा यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पश्‍चिम बंगाल पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक करत तीन एफआयआर नोंदवले गेले आहेत. दगडफेकीबद्दल अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर नोंदवले असून भाजप नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही एक एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने राज्यपालांसह डीजीपी आणि मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला होता.