पशूखाद्य दरवाढ : दूध उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा

0
154

गोवा डेअरीत झालेली कामगार भरती, पशुखाद्य खरेदी व अन्य मशिनरी खरेदी करण्यात झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करून सर्व रक्कम वसूल करण्याची गरज आहे. गोवा डेअरीच्या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. पशुखाद्यात केलेली २.५० रुपये केलेली दरवाढ दि. १ मे पर्यंत मागे न घेतल्यास दूध उत्पादक गोवा डेअरीच्या गेटसमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा गोवा डेअरी चौकशी समिती अभियानने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.

गोवा डेअरीच्या गेटसमोर मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत बोलताना समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी नवसो सावंत, माधव सहकारी व राधिका काळे यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. तसेच नवसो सावंत यांच्याशी हातमिळवणी करणार्‍या ८ संचालकाची संचालकाची चौकशी केल्यास अनेक प्रकरणे उघड होणार असल्याचे सांगितले. गोवा डेअरीला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सर्व प्रथम संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याची आवश्यकता आहे . पशुखाद्य साठी वाढवलेली रक्कम दि. १ मे पर्यंत मागे न घेतल्यास त्यानंतर ८ दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी सांगितले.

या बैठकीत जयंत देसाई, वैभव पर , विकास प्रभू, अनुप देसाई व अन्य सुमारे १०० हून अधिक दूध उत्पादक उपस्थित होते.