पवित्र महिना रमजानचा

0
188
  •  गौरी भालचंद्र

समोर पाणी असताना.. अत्यंत तहान लागलेली असतानाही रोजेदार पाणी पीत नाही… राग येण्यासारख्या बाबी घडत असल्या तरी आपल्या रागावर संयम ठेवत असतो.. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच गरिबांच्या किंवा दुसर्‍याच्या भुकेची जाणीव होते… हे सांगणारा हा रमजानचा पवित्र महिना.

रमजानचा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो.. या महिन्यात कुराणचे वाचन सर्वात पुण्यप्रद मानले जाते.. ज्यांना कुराण वाचता येत नाही त्यांना कुराण ऐकण्याचा अवसर जरूर मिळतो… रमजानचा महिना कधी २९ तर कधी ३० दिवसांचा असतो… या महिन्यात महिनाभर सर्व मुस्लीम ज्ञाती बांधव उपवास ठेवतात … रोजा असतो त्यांचा… उपासाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तासभर आधी काहीतरी खाल्ले जाते… त्याला सेहेर असे म्हटले जाते… पूर्ण दिवसभर काही खाणे-पिणे नसते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मगरीबचा नमाज अदा करूनच उपवास सोडला जातो ज्याला इफ्तारी असे म्हणतात … या महिन्यात अल्लाह तालाची इबादत म्हणजेच उपासना जास्त केली जाते… कुराण पठण .. दानधर्मही त्यासोबत केला जातो… याच महिन्यात समाजातील गरीब आणि गरजू असलेल्या बांधवाना मदत केली जाते… दुसर्‍याला मदत करणे .. दुसर्‍याच्या उपयोगी पडणे… हेच कुराणमध्ये सांगितले आहे… या काळात इस्लाममध्ये जकातला खूपच महत्त्व आहे… धार्मिक बाबतीत याचे ङ्गार महत्त्व मानले जाते…
कुराणच्या आयात नंबर ८३ मध्ये रोज ठेवणे प्रत्येक मुस्लिमांसाठी जरुरी आहे असे सांगण्यात आलेले आहे…या काळात रागावर नियंत्रण ठेवावे असेही सांगण्यात आलेले आहे. कोणाबद्दल द्वेषभावना असेल तर त्याला मनापासून माङ्ग करून त्याच्याशी सलोख्याने रहावे, असे सांगण्यात आले आहे ज्यामध्ये अहंकार असेल व दिसेल असे कोणतेही काम या महिन्यात केले जात नाही. या महिन्यात केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचे ङ्गळ भरपूर प्रमाणात मिळते…
रोजा ठेवणे म्हणजे ङ्गक्त उपवास नसून अल्लाह तालाची इबादत म्हणजेच उपासना करणे हा उद्देश असतो… या महिन्यात कोणतेही गैर काम करणे योग्य समजले जात नाही… रोजा हा इस्लाममधील पूर्ण उपवासाचा महिना आहे… आणि तो आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे शिकवतो.. कारण खाणं समोर असताना सुद्धा ते न खाणे आणि आपल्या स्वतःवर मानसिक तसेच शारीरिक संयम ठेवून ते न खाणे हे ङ्गार महत्त्वाचे असते… या काळात पूर्ण महिनाभर दिवसभर उपवास केला जातो… उपवासासोबत मनाची शुद्धीपण आवश्यक आहे.. सूर्योदयापूर्वी तासभर आधी काहीतरी खाता येते ..
इस्लामच्या पाच महत्त्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये कलमा म्हणजेच अल्लाहला एक मानणे … नमाज .. जकात म्हणजेच दान.. रोजा आणि मक्का यात्रा … गोष्टींपैकी रोजा ही एक महत्त्वाची आहे… सकाळची जी सर्वात सुरवातीची अजान त्यावेळेपासून संघ्याकाळी सूर्यास्तापर्यंत उपवास असतो .. मग नमाज अदा करूनच उपवास सोडला जातो… या काळात एक-दुसर्‍याची मदत करणे… जकात देणे म्हणजेच गरिबांना जास्तीत जास्त दान देणे या गोष्टी केल्या जातात
या कालावधीत आपल्या आत्म्याला पवित्र करणे, शुद्ध करणे … रोजा करताना माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवत असतो… समोर पाणी असताना.. अत्यंत तहान लागलेली असतानाही रोजेदार पाणी पीत नाही… राग येण्यासारख्या बाबी घडत असल्या तरी आपल्या रागावर संयम ठेवत असतो… असे करून प्रत्येक जण आपल्या मनाला पवित्र आणि शुद्ध करत असतो… जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच गरिबांच्या किंवा दुसर्‍याच्या भुकेची जाणीव होते… हे सांगणारा हा रमजानचा पवित्र महिना.