पर्वरी महामार्गावरील अपघातात युवक ठार

0
7

पर्वरी येथील तिस्क जंक्शनवर पार्क केलेल्या ट्रकवर आपटून दुचाकी चालकाचे निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. १७ रोजी पहाटे ३.३० वाजता हा अपघात झाला. येथील तिस्कवर रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकला (केए २५ एबी ५१६१) मागच्या बाजूला दुचाकी चालक रुपेश विश्वकर्मा (३७, रा. सांगोल्डा) याची म्हापसा येथे जाताना ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात रुपेश याचे निधन झाले असून ट्रकचालक बसवराज याला पोलिसांनी अटक केली आहे. पार्किंग लाईट न लावल्यामुळे सदर अपघात झाला असल्याचे सांगून पोलिसांनी बसवराजविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.