पर्रीकरांची मंत्र्यांबरोबर एम्समध्ये बैठक हे नाटक ः कॉंग्रेस

0
109

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपल्या मंत्र्यांची घेतलेली बैठक केवळ एक राजकीय नाटक असल्याची टीका काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
राज्यात सरकार आहे हे दाखवण्यासाठी पर्रीकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेली ती एक केविलवाणी धडपड होती, असे चोडणकर म्हणाले. पर्रीकर सरकार हे केवळ नावापुरते राहिले असल्याने आता पक्षजनांकडूनही सरकारवर टीका होऊ लागली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. पर्रीकर यांच्यावर नवी दिल्लीतील एम्समध्ये मंत्र्यांची बैठक घेण्याची पाळी आली त्यावरूनच सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे हे सिद्ध होत असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे.